पनवेल : पनवेल महानगरपालिका हद्दीतील मुस्लिम व ख्रिस्ती दफनभूमी येथे शेतकरी कामगार पक्षाच्या स्थानिक नगरसेविका प्रीती जॉर्ज- म्हात्रे यांच्या नगरसेवक निधीतून पथदीप (स्ट्रीट लाईट) व्यवस्था करण्यात आली आहे.
विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली खांदा कॉलनी बालभारती जवळील मुस्लिम व ख्रिस्ती दफनभूमी येथे पथदीप (स्ट्रीट लाईट) बसविण्यात आली आहे. या ठिकाणी विजेची सुविधा नव्हती. त्यामुळे रात्रीच्या वेळेस अंधार पडायचा. रात्रीच्या अंधारात मृतदेह दफन करतेवेळी मोठ्या प्रमाणात संकटे आणि अंधाराचा सामना करावा लागत असे. हि बाब लक्षात आल्यानंतर विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली नगरसेविका प्रीती जॉर्ज- म्हात्रे यांच्या नगरसेवक निधीतून पथदीप (स्ट्रीट लाईट) बसविण्यात आली आहे.