नगराध्यक्ष साहेब..! नागसेन नगरचे रस्ता व नालीचे काम करा मग भूषाण दाखवा- लखन जोगदंड. (बीड प्रतिनिधी--विवेक कुचेकर) येथील कॉलेज ते पंचशील नगर मार्गे पालवण चौकाकडे जाणाऱ्या रस्त्याची माजी आमदारांनी व नगराध्यक्ष साहेबांनी उद्घाटने करूनही भूषाण दाखवले पण आज तागायत रस्ता व नालीचे काम झालेले नाही.अनेक वेळा उद्घाटने करूनही लोकप्रतिनिधींनी येथील नागरिकांची दिशाभूल केली आहे.मा.आ.जयदत्त क्षीरसागर, आमदार विनायक मेटे तसेच बीड नगराध्यक्ष भारतभूषण क्षीरसागर यांनी अतिशय थाटामाटात खड्डे असलेल्या व नाली नसलेल्‍या ठिकाणी स्टेज करून विकास काम करणार असल्याचे खोटे आश्वासने देऊन लोकांची मते मिळवली परंतु त्यांना लोकांचा विश्वास संपादन करता आला नाही त्यांनी गेल्या काही वर्षांपासून संबंध बीड तालुक्यातील जनतेला मुर्खात काढण्याचे काम केले आहे. येणाऱ्या काळामध्ये बीड तालुक्यातील जनता यांनी न केलेल्या कामाचा लेखाजोखा लक्षात ठेवून त्यांना त्यांची जागा दाखवून देणार ज्यांच्या नावांमध्ये भारतभूषण हा शब्द आहे त्यांना साधे बीड भूषण सुद्धा करता आले नाही. बीड शहरातील रस्त्यांची नाल्यांची दयनीय अवस्था झालेली असतानाही झोपेचे सोंग घेणाऱ्या आमदार जयदत्त क्षीरसागर ,विनायक मेटे तसेच बीडचे नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांना आता तरी जाग येणार का असा संतप्त सवाल वंचित बहुजन आघाडीचे मा.शहराध्यक्ष लखन जोगदंड यांनी केला आहे. नुसतेच बीड शहरातील उपनगरांच्या विविध विकास कामांचे उद्घाटन करण्यापेक्षा आधी काम करावे मग सांगावे या उक्तीप्रमाणे जमणार आहे की नाही असेही यावेळी वंचित बहुजन आघाडी बीडचे लखन जोगदंड यांनी म्हटले आहे बीड शहरातील उद्घाटने केलेल्या सर्व कामांना गती देण्यासाठी तात्काळ उपाय योजना आखाव्यात जेणे करून सामान्य नागरिकांची विद्यार्थ्यांची तसेच वयोवृद्ध माणसांची वाहनधारकांची हेळसांड होणार नाही याची गांभीर्याने दखल घ्यावी अन्यथा वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून कामे न केल्याबद्दल आपला सामुहिक जाहीर सत्काराचे आयोजन करण्यात येईल असेही प्रसिद्धीपत्रकाद्वारे वंचित बहुजन आघाडीचे लखन जोगदंड यांनी कळवले आहे.


(बीड प्रतिनिधी--विवेक कुचेकर) येथील कॉलेज ते पंचशील नगर मार्गे पालवण चौकाकडे जाणाऱ्या रस्त्याची माजी आमदारांनी व नगराध्यक्ष साहेबांनी उद्घाटने करूनही भूषाण दाखवले पण आज तागायत रस्ता व नालीचे काम झालेले नाही.अनेक वेळा उद्घाटने करूनही लोकप्रतिनिधींनी येथील नागरिकांची दिशाभूल केली आहे.मा.आ.जयदत्त क्षीरसागर, आमदार विनायक मेटे तसेच बीड नगराध्यक्ष भारतभूषण क्षीरसागर यांनी अतिशय थाटामाटात खड्डे असलेल्या व नाली नसलेल्‍या ठिकाणी स्टेज करून विकास काम करणार असल्याचे खोटे आश्वासने देऊन लोकांची मते मिळवली परंतु त्यांना लोकांचा विश्वास संपादन करता आला नाही त्यांनी गेल्या काही वर्षांपासून संबंध बीड तालुक्यातील जनतेला मुर्खात काढण्याचे काम केले आहे. येणाऱ्या काळामध्ये बीड तालुक्यातील जनता यांनी न केलेल्या कामाचा लेखाजोखा लक्षात ठेवून त्यांना त्यांची जागा दाखवून देणार ज्यांच्या नावांमध्ये भारतभूषण हा शब्द आहे त्यांना साधे बीड भूषण सुद्धा करता आले नाही. बीड शहरातील रस्त्यांची नाल्यांची दयनीय अवस्था झालेली असतानाही झोपेचे सोंग घेणाऱ्या आमदार जयदत्त क्षीरसागर ,विनायक मेटे तसेच बीडचे नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांना आता तरी जाग येणार का असा संतप्त सवाल वंचित बहुजन आघाडीचे मा.शहराध्यक्ष लखन जोगदंड यांनी केला आहे. नुसतेच बीड शहरातील उपनगरांच्या विविध विकास कामांचे उद्घाटन करण्यापेक्षा आधी काम करावे मग सांगावे या उक्तीप्रमाणे जमणार आहे की नाही असेही यावेळी वंचित बहुजन आघाडी बीडचे लखन  जोगदंड यांनी म्हटले आहे बीड शहरातील उद्घाटने केलेल्या सर्व कामांना गती देण्यासाठी तात्काळ उपाय योजना आखाव्यात जेणे करून सामान्य नागरिकांची विद्यार्थ्यांची तसेच वयोवृद्ध माणसांची वाहनधारकांची हेळसांड होणार नाही याची गांभीर्याने दखल घ्यावी अन्यथा वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून कामे न केल्याबद्दल आपला सामुहिक जाहीर सत्काराचे आयोजन करण्यात येईल असेही प्रसिद्धीपत्रकाद्वारे वंचित बहुजन आघाडीचे लखन जोगदंड यांनी कळवले आहे.