उरणमध्ये धम्म चक्र प्रवर्तन दिन साजरा.






उरणमध्ये धम्म चक्र प्रवर्तन दिन साजरा.

 

उरण दि २६(विट्ठल ममताबादे)

बौध्दजन पंचायत समिती उरण शाखा नं ८४३ उरण बौध्द वाडी येथे ६४ वा धम्म चक्र प्रवर्तन दिन साजरा करण्यात आला.यावेळी  नगरसेवक रवी भोईर,नगरसेवक कौशिक शहा,  उद्योगपती जितेंद्र पडते,उद्योजक राजेंद्र पडते, निलेश पाटील भा ज प उरण शहर अध्यक्ष,समाजसेवक हितेश शहा,बौद्धजन पंचायत समितीचे अध्यक्ष-प्रकाश कांबळे,चिटणीस विजय पवार,सहचिटणीस रोशन गाढे, विनोद कांबळे, मारुती तांबे, बौध्दचारी महेंद्र साळवी, प्रमोद कांबळे,हर्षद कांबळे, आखिलेश जाधव, धनाजी ठाकुर, विजय भिंगावडे आदि समितीचे पदाधिकारी सदस्य उपस्थित होते.दरवर्षी प्रमाणे याही वर्षी धम्मचक्र प्रवर्तन दिन मोठ्या उत्साहात यावेळी साजरा करण्यात आला.