गायीच्या हंबरण्याचा गोंगाट एवढा झाला,
बाईच्या किंकाळीचा आवाज पोहचलाच नाही..!
देशात हाथरस येथे घडलेल्या घटनेमुळे सर्वत्र दु:खाचे लोट उठत आहेत, महीला मुली भयभित होताना दिसत आहेत. पण महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे नागपूर विद्यापीठाच्या जमनालाल बजाज प्रशासकीय इमारतीच्या उद्घाटन प्रसंगी अकलेचे तारे तोडताना ते विद्यार्थ्यांना म्हणाले की, संस्कृत श्लोक शिका त्यामुळे देशात दररोज होणा-या क्रूर बलात्कारांच्या घटनांना आळा बसेल. तेव्हा कोश्यारी यांच्या सदसद्विवेकबुद्धीवर काही प्रश्न पडतात पडतात कारण देशात महीला मुली सुरक्षित नाहीत तरीही अशी चेष्टा व अंधश्रद्धा पसरणारी वक्तव्य जर करत असतील तर त्यांच्या डोक्यात मेंदू नसून त्याऐवजी गोबर असावे ? असे वाटते. म्हणजेच 'कोशियारी यांची ही जास्तीची होशियारी तर नसावी ?. म्हणून तर इतिहास संशोधक डाॅ. श्रीमंत कोकाटे म्हणतात की, संघ भाजपवाले स्त्रीद्वेष्टे, विषमतावादी, अवैज्ञानिक विकृतींची टोळी आहे.
उत्तर प्रदेशातील हाथरस या ठिकाणी १९ वर्षाय दलित तरूणी सामूहिक बलात्काराची शिकार झाली या घटनेचा देशभर संताप व्यक्त होतो आहे. काँग्रेसचे खासदार राहुल गांधी आणि प्रियंका गांधी हे दोघेही हाथरस येथील बलात्कार पीडितेच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी जात असताना त्यांना रस्त्यातच आडवूण राहुल गांधींना पोलिसांकडून धक्काबुक्की करण्यात आल्याचे व्हायरल व्हिडोमध्ये दिसत आहे.
हारथस येथिल घटना खुप निंदनीय आहे त्यावर समाजात प्रचंड चीड निर्माण झालेली दिसतेय पण ब्राम्हणी प्रसारमाध्यमं जसं कंगना प्रकरणात जीव तोडून आरडा ओरडा करत होती तसा कल्लोळ हाथरस प्रकरणात करताना दिसत नाही हा मिडीयाचा दहशतवाद नाहीतर काय आहे ?
या घटनेबद्दल अनेकांनी मत व्यक्त केलं त्यात आजपर्यंत निद्रीस्त अवस्थेत असलेले ज्यांच्याबद्दल आजही गावखेड्यात तरुण मंडळी कुतुहलाने कुंभकर्ण बोलतात असे अण्णा हजारे यांनीही यावर प्रतिक्रिया देताना म्हटले की,
'उत्तर प्रदेशातील हाथरस या गावात घडलेली घटना हे फक्त नराधमांचं दुष्कृत्य नसून माणुसकीला लागलेला कलंक आहे. हाथरस येथे मुलीचा बळी नाही तर माणुसकीचा बळी गेला आहे. ज्यांनी कायदा आणि सुव्यवस्था सांभाळण्याची जबाबदारी घेतली आहे ते ही जबाबदारी पार पाडण्यात अपुरे पडत आहेत. या प्रकरणातील नराधमांना फासावर लटकवलं पाहिजे., शरद पवार म्हणाले की, उत्तर प्रदेश पोलिसांनी राहुल गांधींसोबत केलेले वर्तन हे अत्यंत निंदनीय आहे. अशा पद्धतीने लोकशाही मूल्ये पायदळी तुडवली जात आहेत. तेव्हा माजी मंत्री शरद पवार यांना विचारावं वाटत की, युपीत भाजप सरकार चालवणारे योगी आदित्यनाथ हे नरेंद्र मोदींचे समर्थक असून नरेंद्र मोदी हे तुमचेच बोट धरून राजकारणात आले असं त्यांनीच यापुर्वी सांगितले होते. मग लोकशाही मुल्य पायदळी तुडवणा-या लोकांकडून तुमची स्तुतीसुमने होतात तेव्हा तुम्हाला लोकशाही मुल्याबद्दल काहीच कसे वाटत नाही ? तेव्हा तुम्ही शांत का असता ?, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे म्हणतात की, हाथरस आणि बलरामपूरमध्ये अत्यंत दुर्दैवी आणि माणुसकीला काळीमा फासणाऱ्या घटना घडल्या आहेत. महाराष्ट्रात महिलांवर अत्याचार काय कुणी वाकड्या नजरेनं पाहिलं तरीही सहन होणार नाही. तेव्हा मुख्यमंत्री ठाकरे यांना सांगावं वाटत की, राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाच्या (National Crime Record Bureau) च्या नोंदींनुसार बलात्कार आणि खुनाच्या सर्वाधिक ४७ घटना महाराष्ट्रात घडल्या आहेत. देशात या प्रकारचे सर्वाधिक गुन्हे आपल्याच राज्यात घडले आहेत. याशिवाय लाजिरवाणी बाब म्हणजे बाल लैंगिक अत्याचार आणि सार्वजनिक वाहतुकीदरम्यान झालेले लैंगिक अत्याचारातही महाराष्ट्रात पुढे आहे, ही बातमी इंडियन एक्स्प्रेसने दिली आहे. (न्यूज १८ लोकमत ०१.१०.२०) यावर पण ठाकरे यांनी लक्ष द्यावं. अन्यथा ठाकरेंचा योगी होण्यास थोडाही वेळ लागणार नाही, त्यामुळे वेळीच योग्य ती खबरदारी घेतली पाहिजे. तसेच सुप्रिया सुळे म्हणाल्या की,
पोलिसांनी न्याय्य मागणीसाठी जाणाऱ्या लोकप्रतिनिधी वा कुठल्याही व्यक्तीची कॉलर धरणं कितपत योग्य आहे?, याचा न्याय मी उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांकडे मागत आहे. त्यानंतर मंत्री यशोमती ठाकूर म्हणाल्या की, उत्तर प्रदेशच्या गुंडाराजमध्ये महिला सुरक्षित नसून लोकशाहीचा खुन होत आहे, हे कुठेतरी थांबलं पाहिजे. बलात्कार पीडित मुलीच्या मृतदेहाला परस्पर आग्नि देणं हे मानवतेच्या नियमाबाहेर आहे. त्याचबरोर जयंत पाटील म्हणाले की, रामाचं नाव घ्यायचं आणि कृती मात्र नथुरामाची करायची ही भाजपची पद्धत. तेव्हा जयंत पाटील यांना सांगावं वाटत की, आईची मान कापणा-या परशुरामाच्या जयंतीला शुभेच्या देणारामध्ये तुमच्याही पक्षाचे लोक दिसतात तेव्हा तुम्ही शांत का असता ? ते तुम्ही बघत बसता आणि वरून प्रामाणिकपणाचे आव आणता कशाला. तसेच यांच्याव्यतिरिक्त कंगणा हीच्या घरी जाऊन आठवले तसे शब्द जोडून कवीता करणारे नटसम्राट मात्र हाथरस येथिल घटनेवर शांत दिसतात तेव्हा प्रा.मा.म.देशमुख यांच्या शब्दांची आठवण होते कारण ते अशाच लोकांसाठी म्हणाले असतील की, हे बहूजनातील पाळीव प्राणी आहेत.
हाथरस येथे मनिषा वाल्मिकी ही मुलगी बलात्काराची शिकार झाली. देशभर या घटनेचा संताप व्यक्त केला जात आहे. अशातच अतिरिक्त पोलीस महासंचालक प्रशांतकुमार हे म्हणतात की,
हाथरस येथिल तरुणीवर बलात्कार झाला नाही. हिंसाचार करण्यासाठी अफवा पसरवली आहे. (थोडक्यात न्यूज ०१.१०.२०) पण अशावेळी एक प्रश्न पडतो की, मुलीवर बलात्कारचं झाला नाही तर मग पोलिसांनी तिचा मृतदेह रात्री २:३० ला का जाळला ? यांचं उत्तर प्रशांतकुमार देतील का ?
देशाला चायवाल्या व्यक्तीने आणि युपीच्या गायवाल्या व्यक्तीने असे काही ग्रासले की, देशात सर्वत्र हाकाकार माजला आणि त्याचाच परिचय काही दिवसांपूर्वी सुध्दा आलेला होता. बेटी बचाव म्हणणा-या बांगडुळांच्या कार्याकाळातच चक्क न्याय मागण्यांसाठी पोलीस स्टेशनमध्ये गेलेल्या मुलीला तेथिल कार्यरत असणाऱ्या पोलिसांनी पहिल्यांदा नाचून दाखवं अशी मागणी केली. (१४ आॅगस्ट २०, द नेशन १८) याच ढोंगी लोकांना गाय प्रिय आहे पण महीला मुलींच्या जीवाची कवडीमात्र किंमत नाही ही खुप मोठी शोकांतिका आहे. म्हणून तर म्हणावेसे वाटते की,
'ना बेटी, ना बहने और ना हि माँ सुरक्षित हैं ,
मोदी योगी तेरे राज्य मे बस गाय सुरक्षित है..!
महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी नागपूर विद्यापीठाच्या जमनालाल बजाज प्रशासकीय इमारतीच्या उद्घाटन प्रसंगी विद्यार्थ्यांना संस्कृत श्लोक शिकवण्यास सांगितले आहे. त्यांचा असा विश्वास आहे की यामुळे देशात दररोज होणा-या क्रूर बलात्कारांच्या घटनांना आळा बसेल.(नवभारत टाइम्स
२० डिसें. १९) तेव्हा काही प्रश्न पडतात कारण की, बलात्कार करणे आमच्या संस्कृतींचा भाग आहे असं भाजपच्या खासदार किरण खेर म्हणाल्या होत्या. म्हणूनच की काय पाठीमागे काही दिवसांपूर्वी भाजपच्या रिना ठाकूर व उपेंद्र पंडीत यांचा एक अश्लिल व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता त्यात रिना ठाकूर यांनी कोश्यारींनी सांगितलेला श्लोक पठण केला नव्हता का ? नसेल केलं तर मग त्यांनी रामदासांनी सांगितलेला 'सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा' हा शृंगारमंत्र उच्चारण केलं होतं का ? कोश्यारींच्या श्लोकामुळे बलात्कारासारख्या घटनांना आवर घालता येतो असं म्हणणं म्हणजे को्यारींचा हा निव्वळ वेडसरपणा म्हणावा का ? त्यामुळे कोश्यारी यांना सांगावं वाटत की, श्लोक पठणाने जर बलात्कार झाले नसते तर आसाराम व रामरहीम जेलमध्ये सडत बसले नसते.
त्यामुळे बहुजन समाजातील विचारवंत साहित्यिक लेखक कवी शिक्षक व चळवळीतील कार्यकर्तींना एक विनंती की, 'परावीया नारी रक्माई समान' म्हणणारे तुकोबा तसेच परस्त्री आईसमान मानणारे छत्रपती शिवाजी महाराज यांचे खरे मानवतावादी विचार तसेच पुणे येथे सावित्रीमाईवर काही बांडगुळांनी अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला तेव्हा सावित्रीमाईंनी ज्यापद्धतीने विरोध केला त्या सावित्रीमाईंचे खरे विचार घराघरापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न कराल तेव्हाच ख-या अर्थाने बलात्काराचे प्रमाण कमी होईल ही जबाबदारी वरील लोकांचीच आहे, अन्यथा कोश्यारी सारख्या विकृती श्लोकांच पठण करायला लावून असाच अंधश्रद्धेला खतपाणी घालत बसतील तेव्हा वेळीच सावध व्हा. कारण श्रीमंत कोकाटे यांनी यापुर्वीच सांगितले होते की, 'संघ भाजपवाले स्त्रीद्वेष्टे, विषमतावादी, अवैज्ञानिक विकृतींची टोळी आहे' तेव्हा या बांगडुळापासून वेळीच सावध व्हा कारण भाजपच्या विकृतींची संस्कृतीच बालात्कारी आहे त्यामुळे या विकृतींचा वेळीच ठेचल पाहिजे
अन्यथा असेच बलात्कार होतील आणि तुम्ही केवळ हातात मेणबत्ती घेऊन फिरताल.
भगवे तरी श्वान सहज वेश त्याचा,
तेथे अनुभवाचा काय पंथ ?
रेपे नवनाथ दत्तात्रय
तालुकाध्यक्ष किल्ले धारूर
ज.तु.सा.प.
मो.९७६२६३६६६२
![]() | ReplyForward |