ठाणे(20) : ठाणे महानगरपालिकेच्या नौपाडा कोपरी प्रभाग समिती अंतर्गत कोपरी क्षेत्रातील कन्हैयानगर जलकुंभ व धोबीघाट जलकुंभ येथील राधाकृष्ण मंदिरासमोर सॅटीस कामात बाधित होत असलेली 400 मी.मी. व्यासाची आऊटलेट जलवाहिनी स्थलांतरीत करण्याचे कामाकरीता बुधवार, दिनांक 21 ऑक्टोबर, 2020 रोजी सकाळी 9.00 ते गुरुवार, दिनांक 22 ऑक्टोबर, 2020 रोजी सकाळी 9.00 वाजेपर्यंत (24 तास) पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.
उपरोक्त शटडाऊनमुळे कन्हैयानगर जलकुंभ व धोबीघाट जलकुंभ क्षेत्रातील कोळीवाडा, सुदर्शन कॉलनी, साईनगरी, नातु कॉलनी, सावरकरनगर, वाल्मिमीपाडा सोसायटी, कुंभारवाडा, गुरुदेव सोसायटी, क्रिष्नानगर, स्वामी समर्थ मठ, आनंदनगर, गांधीनगर, सिध्दिविनायक नगर, सिध्दार्थनगर, बारा बंगला, ठाणेकर वाडी, कोपरीगांव, जगदाळे वाडी, पै गल्ली इत्यादी परिसराचा पाणी पुरवठा बंद राहील.
या शटडाऊनमुळे पाणी पुरवठा पूर्वपदावर येईपर्यंत पुढील एक ते दोन दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होणार असून, नागरिकांनी पाण्याचा योग्यतो वापर करुन पालिकेस सहकार्य करावे असे आवाहन पाणी पुरवठा विभागाने केले आहे.