उत्तरप्रदेश हाथरस येथील नराधमांना भरचौकात फाशी शिक्षा देण्यात यावी. - विवेक कुचेकर


   (बीड  प्रतिनिधी,)उत्तरप्रदेश, हाथरस जिल्ह्यातील चंदपा पोलीस हद्दीत दि. 14 सप्टेंबर 2020 रोजी 19 वर्षीय अल्पवयीन दलित मुलगी शेतात काम करत असतांना चार जातीयवादी नराधमाने तिच्यावर पाशवी सामूहिक बलात्कार केला, अमानुषपणे मारहाण केली तिची जीभ दाताने तोडली, पाठीचा कणा मोडला तर मानेचा मणक्यावर गंभीर इजा केली आहे. 15 दिवस मृत्यूशी झुंज देणाऱ्या मानिषा वाल्मिकी या पीडितांने अखेर शेवटचा निरोप घेतला.
ही घटना मानवतेला काळीमा फासणारी घटना आहे. उत्तरप्रदेशमधील योगी सरकारच्या कार्यकाळात दलित अत्याचार हत्याकांड वाढले आहे. हे सरकार दलितविरोधी, बहुजन बेटीविरोधी सरकार आहे. बेटी बचाओ नाही तर बेटी मिटाव हाच या सरकारचा अजेंडा राहिलेला आहे. 
 उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे जातीय मानसिकतेचे असून जातीयता हीच त्यांची ओळख आहे, त्यांच्या कार्यकाळात दलित हत्याकांड, बलात्कार, महिला अत्याचार असे हजारो घटना घडल्या आहेत त्यामुळे त्यांनी तात्काळ राजीनामा दिलाच पाहिजे.
हाथरस अत्याचार प्रकरणातील नराधम आरोपीना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे.या प्रकरणातील निष्क्रिय जातीयवृत्तीच्या पोलीस अधिकाऱ्याला सहआरोपी केलेच पाहिजे. जातीय दृष्टिकोणातुन दलितविरोधी, महिलाविरोधी सरकार पाडून, उत्तरप्रदेशात राष्ट्रपती राजवट लावलीच पाहिजे.तात्काळ दलित अत्याचार रोखण्यासाठी राष्ट्रीय कार्यक्रम जाहीर करावा आणि या जातीयतेच्या कोरोना विरोधात गांभीर्याने पाहावे अन्यथा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने त्रीव स्वरूपाचे आंदोलन करण्याचा ईशारा वंचित बहुजन आघाडीचे बीड तालुका नेते विवेक कुचेकर यानी दिला आहे 
    उत्तर प्रदेश मनीषा वाल्मिकी हत्याकांडाच्या
 निमित्ताने उत्तर प्रदेश योगी सरकार बरखास्त करण्यात यावे.सदर खटल्याची सर्वोच्च न्यायालयाच्या विद्यमान न्यायमूर्ती मार्फत विशेष चौकशी समिती गठित करण्यात येऊन 30 दिवसाच्या आत चार्जशीट तयार करण्यात यावे.
सदर खटला उत्तर प्रदेश बाहेर मुंबई, चेन्नई, कोलकाता अथवा दिल्ली उच्च न्यायालयात चालविण्यात यावा. 
मनीषा वाल्मिकी हिचा अंतिम संस्कारच्या नावाखाली महत्वपूर्ण पुनर्तपासणी चे पुरावे नष्ट केल्याप्रकरणी जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक व त्यांना आदेशित करणाऱ्या मंत्र्यांवर 302 ,120 अन्वये गुन्हा दाखल करून त्यांच्यावर अटकेची कारवाई करावी.
या घटनेतील फिर्यादी यांचे कुटुंबीय व साक्षीदारांना संपूर्ण संरक्षण देण्यात यावे अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे बीड तालुका नेते विवेक कुचेकर यानी केली आहे