डॉ, राधाकिसन पवार यांची सूडबुद्धीने कारवाई, कोविड कक्ष स्थापन करण्याचे लेखी आदेश दिले, त्याच दवाखान्याला अनधिकृत म्हणून चौकशी, मुख्यमंत्री आरोग्यमंत्री आयुक्तांना लेखी तक्रार :- डॉ. गणेश ढवळे लिंबागणेशकर
----------------------------------------------- (बीड प्रतिनिधी--विवेक कुचेकर)डॉ.राधाकिसन पवार जिल्हा आरोग्य अधिकारी बीड यांनी ज्या क्लिनिक मध्ये कोविड-१९ संभाव्य रूग्ण तपासणी कक्ष स्थापन करणायाचे लेखी पत्रक आरोग्य कर्मचा-या मार्फत दिले होते, त्याच दवाखान्याची अनधिकृतपणे चालवत असल्याबद्दल पोलीस यंत्रणा व वैद्यकीय यंत्रणेमार्फत चौकशी करून बदनामीचे षडयंत्र डॉ.अशोक थोरात जिल्हा शल्य चिकित्सक, डॉ. राधाकिसन पवार जिल्हा आरोग्य अधिकारी, व डॉ, प्रतिभा रकटे, वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र लिंबागणेश यांनी त्यांच्या अनागोंदी कारभाराच्या विरोधात मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री, आयुक्त आरोग्य सेवा संचनालय मुंबई यांना केल्यामुळे सूडबुद्धीने रचले याविषयी चौकशी करून संबंधित दोषींवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी जिल्हाधिकारी उपसंचालक आरोग्य सेवा परिमंडळ लातूर यांच्या मार्फत मुख्यमंत्री आरोग्यमंत्री आयुक्त आरोग्य सेवा संचनालय मुंबई यांना केली आहे.
सविस्तर माहितीसाठी:- दि. ०८/०९/२०२० रोजी डॉ, प्रतिभा रकटे, वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र लिंबागणेश यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.राधाकिसन पवार यांनी डॉ, कासट एन, डी, यांना जा क्र/जिआअकाबी/आस्था/९५७/२०२० जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय बीड दिनांक ०८/०९/२०२० रोजीच्या पत्रावरून डॉ. गणेश ढवळे अनाधिकृत दवाखाना चालवत असल्याबद्दल तात्काळ चौकशी करून कार्यवाही करणेबाबत सांगितले होते, त्या मध्ये डॉ, गणेश ढवळे यांचे नर्सिंग होम मध्ये अनाधिकृत औषधीसाठा आहे व अनाधिकृत दवाखाना चालवत असल्याचे म्हटले आहे,
दवाखाना अनधिकृत असेल तर कोविड कक्ष स्थापन करण्यासाठी लेखी पत्रक दिले कसे????
----------------------------------------------- सर्वात प्रथम डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांचे " दिपक क्लिनिक " आहे, नर्सिंग होम नाही, दुसरी गोष्ट जर डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांचे क्लिनिक अनाधिकृत असेल तर डॉ. राधाकिसन पवार जिल्हा आरोग्य अधिकारी बीड यांनी स्वतः च्या सहीनिशी कोविड कक्ष स्थापन करण्यात यावे असे लेखी पत्रक प्राथमिक आरोग्य केंद्राचे कर्मचारी यांना डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्या क्लिनिक मध्ये का पाठवले??
डॉ.गणेश ढवळे यांच्या दिपक क्लिनिक मध्ये अनाधिकृत औषधीसाठा असेल तर औषध निरीक्षक रामेश्वर डोईफोडे यांनी जप्त करून गुन्हा दाखल का केला नाही???
----------------------------------------------- डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांची पदवी बी.ए. एम.एस. असुन रजिस्ट्रेशन नं I-36149-A-1 आहे, त्यांच्या रजिस्ट्रेशन दिनांक ०६/०५/२०२४ पर्यंत आहे, दि, ०२/०९/२०२० पासुन १५/०९/२०२० पर्यंत लिंबागणेश संपूर्ण गावात संचारबंदी होती, त्यामुळे बीडवरून आवक जावक करणारे लिंबागणेश येथिल औषध दुकानदार व खाजगी डॉक्टर यांचे येण्या जाण्याचे प्रमाण कमी झाल्यामुळे व आम्ही स्थानिक असल्याने आवश्यक औषधीसाठा ठेवला होता ज्यामध्ये आक्षेपार्ह गर्भपातासारखी कुठलीही औषधे नव्हती, त्यामुळे रामेश्वर डोईफोडे यांनी कोणतेही औषध जप्त न करता गुन्हा दाखल करण्यात आला नाही, खाजगी डॉक्टर रूग्ण तपासण्यात कुचराई करत असताना आम्ही रुग्ण सेवा देत आहोत
सूडबुद्धीने कारवाई करण्याचे कारण:- वरीष्ठांना केलेली लेखी तक्रार:- डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर
----------------------------------------------- डॉ.रकटे वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र लिंबागणेश या लिंबागणेश येथील आरोग्य केंद्रात वारंवार गैरहजर असतात, परिचारिका कडून रूग्णांना उपचार घ्यावे लागतात याविषयी डॉ. गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी दि, १८/०३/२०२० रोजी मुख्यमंत्री आरोग्यमंत्री आयुक्त यांना जिल्हाधिकारी बीड यांच्या मार्फत लेखी तक्रार केली होती, त्यावरून जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी जिल्हा परिषद बीड जाक्रजिपबी/आदि/आस्था/-१/कावि-/ ६७९/१९ पत्रक दि, २०/०३/२०२० अन्वये दि, २०/०३/२०२० रोजी मुख्यालयी राहात नसल्याबद्दल महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम १९७९ चे नियम ३(१) (दोन) चा भंग केला आहे म्हणून आपणाविरूद्ध महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपिल) नियम १९७९ नुसार प्रशासकीय कारवाई का करण्यात येऊ नये या बाबत ७ दिवसाच्या आत खुलासा मागवला होता, यामुळे सूडबुद्धीने सर्व कागदपत्रे असताना केवळ मनस्ताप व दबाव आणण्यासाठी खोटी तक्रार नेकनूर पोलीस ठाण्यात केली .
डॉ. राधाकिसन पवार जिल्हा आरोग्य अधिकारी बीड यांची तक्रार
----------------------------------------------
दि, ३०/०९/२०२० रोजी डॉ, राधाकिसन पवार जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत गावातील जिल्हाधिकारी बीड यांनी ३२७ लोकांची संभाव्य कोरोना संशयितांची यादी तयार केली होती, त्यामध्ये बोगस लोकांची नावे दाखल करण्यात आली असून या गैरकारभारास डॉ, राधाकिसन पवार मुख्य सुत्रधार असल्याची लेखी तक्रार पंतप्रधान, केंद्रीय आरोग्य मंत्री, मुख्यमंत्री आरोग्यमंत्री आयुक्त आरोग्य सेवा संचनालय मुंबई यांना केली होती या गोष्टीचा राग मनात धरून कारवाई केली,
१२ घंटे कोरोना रूग्ण ताटकळत असल्याची तक्रार जिव्हारी लागली
----------------------------------------------
आरोग्य विभागाचा ग्रामिण भागातील ढिसाळ कारभार, त्यातच दि ०५/०९/२०२० रोजी लिंबागणेश येथील ५ कोरोना बाधित रुग्णांना नेण्यासाठी रूग्णवाहिका न आल्यामुळे रात्रभर १२ घंटे रुग्णांची हेळसांड केल्याप्रकरणी विविध दैनिकात, ईलेक्ट्रॉनिक मिडीयावर पोलखोल केल्यामुळे मनामध्ये राग होता, तो सूडबुद्धीने खोटी कारवाई करुन काढण्यात आला याविषयी मुख्यमंत्री आरोग्यमंत्री आयुक्त आरोग्य सेवा संचनालय मुंबई यांना जिल्हाधिकारी बीड, उपसंचालक आरोग्य सेवा परिमंडळ लातूर यांच्या मार्फत लेखी तक्रार केली आहे,