अखेर मांजरसुंबा ते नेकनूर रस्त्याचे काम सुरू,केंद्रीय मंत्री नितिन गडकरी, मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना लेखी तक्रार, :- डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर
---------------------------------------------- (बीड प्रतिनिधी-विवेक कुचेकर) राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५२ सोलापूर ते धुळे मांजरसुंबा ते नेकनूर दरम्यान गवारी फाट्याजवळ रस्ताकाम काही कारणामुळे रखडलेले होते, मांजरसुंबा ते नेकनूर राष्ट्रीय महामार्ग सिमेंट रस्ता काम दोन वर्षापासून अर्धवट अवस्थेत होते तसेच वर्षभरापूर्वी केलेल्या सिमेंट रस्त्याला तडे गेलेले असल्याने या निकृष्ट दर्जाच्या कामाची गुणनियंत्रक विभागामार्फत चौकशी करण्यात यावी अशी मागणी केली होती, याविषयी दि, ११ जुन रोजी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना जिल्हाधिकारी बीड यांच्या मार्फत लेखी तक्रार करण्यात आली होती, याविषयी विविध दैनिकात बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या, अखेर या रस्त्याचे काम युद्ध पातळीवर सुरू झाले आहे,
सविस्तर माहितीसाठी:- सोलापूर ते धुळे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५२ , मांजरसुंबा ते नेकनूर गवारी फाट्याजवळ रस्ताकाम बंद करण्यात आले होते, पावसाळ्यात खड्यात पाणी साचत असल्यामुळे व खराब रस्ता असल्याने नागरीकांना मनक्याचे व पाठीचे आजार वाढल्याच्या नागरीकांच्या तक्रारी वाढल्या होत्या तसेच वर्षभरापूर्वी केलेल्या सिमेंट रस्ता कामाला तडे गेलेले होते,या निकृष्ट दर्जाच्या कामाची गुणनियंत्रक विभागामार्फत चौकशी करण्यात यावी अशी मागणी केली होती याविषयी दि . ११ जुन रोजी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, तसेच मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना लेखी तक्रार ईमेलद्वारे पाठवण्यात आली होती, याविषयी संबधित विभागाला कळवल्याचा ईमेल सुद्धा प्राप्त झाला होता, दोन दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्यानंतर युद्ध पातळीवर रस्ता काम सुरू झाले आहे,