आमदार प्रताप सरनाईक यांच्या सहकार्याने रवि रामकृष्ण घरत यांनी सोडविला नागरिकांच्या रहदारीचा प्रश्न

आमदार प्रताप सरनाईक यांच्या सहकार्याने रवि रामकृष्ण घरत यांनी सोडविला नागरिकांच्या रहदारीचा प्रश्न

नागरिकांनी मानले युवा नेते / समाजसेवक रवि रामकृष्ण घरत यांचे आभार

ठाणे, दि. २३ - तीन गृहसंकुलानी एकमेकांच्या हद्दीत उभारलेली गेट व त्यातून निर्माण झालेला सुमारे ४००० नागरिकांच्या रहदारीचा प्रश्न अखेर आमदार प्रताप सरनाईक यांच्या सहकार्याने समाजसेवक रवि रामकृष्ण घरत यांनी सोडविला आहे. सणासुदीच्या दिवसांत रवि रामकृष्ण घरत यांच्या पुढाकाराने हा प्रश्न सुटल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

ठाणे महानगर पालिका हद्दीत घोडबंदर रोड जवळील वाघबिळ येथील वसंत लीला, विजय नगरी अनेक्स व विजय नगरी या  तीन गृहसंकुलातील वहिवाटीचा रस्ता ( ठामपा विकास आराखड्यानुसार १९९५ सालातील मंजुरीनुसार ) व त्यावर उभारलेले अनधिकृत गेट यातून गैरसमज निर्माण झाले होते. त्यातून उद्भवलेल्या महापालिका प्रशासनाकडील तक्रारी तसेच नवरात्री सणाच्या दिवसांत दोन्ही गृहसंकुलातील जवळजवळ ४०००  नागरिकांना होणाऱ्या अडचणींवर स्थानिक आमदार प्रताप सरनाईक यांच्या सहकार्याने रवि रामकृष्ण घरत यांनी मध्यस्थी केली. ठाणे महापालिका आयुक्त, उपायुक्त, सहाय्यक आयुक्त तसेच महापालिका प्रशासन यांच्याशी याप्रकरणी  समन्वय साधून तोडगा काढण्यात स्थानिक युवा नेते रवि रामकृष्ण घरत यांना यश आले.
तिन्ही गृहसंकुलातील नागरिकांशी सामोपचाराने संभाषण घडवून आणून सदर वहिवाटीचा रस्ता खुला करण्यात आले आहे.

 सदर प्रकरणाचा जवळ जवळ अडीच महिने चाललेला तिढा आमदार प्रताप सरनाईक व युवा नेते रवि रामकृष्ण घरत यांनी यशस्वीरित्या सोडविल्याबद्दल तिन्ही संकुलातील नागरिकांनी आनंद व्यक्त करत त्यांचे आभार मानले आहे.