डॉ. अशोक थोरात दांमपत्यांची विभागीय चौकशी ५ वर्षापासून रखडलेली,तात्काळ चौकशी पूर्ण करून कारवाईसाठी, आयुक्तांना लेखी तक्रार:- डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर
-----------------------------------------------(बीड प्रतिनिधी--विवेक कुचेकर) शासकीय अधिकारी यांच्या बद्दल काही तक्रारी प्राप्त झाल्यानंतर त्यांची विभागीय चौकशी करण्यात येते, परंतु सहसा ती सहा महिने अथवा जास्तीत जास्त वर्षभरात करून अहवाल प्राप्त झाल्यानंतर कारवाई करणे अपेक्षित असताना डॉ.अशोक थोरात व डॉ.प्रतिभा थोरात या दांमपत्यांची विभागीय चौकशी गेली ५ वर्ष पूर्ण झालीच नाही, याविषयी जिल्हाधिकारी, उपसंचालक यांच्या मार्फत मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री, आयुक्त आरोग्य सेवा संचनालय मुंबई यांना लेखी तक्रार केली आहे,
सविस्तर माहितीसाठी:- डॉ.अशोक थोरात, उपजिल्हा रूग्णालय केज जि.बीड येथे कार्यरत असताना दि.१ जुलै २०१२ रोजी घडलेल्या अल्पवयीन अविवाहित मुलीवरील बलात्कार प्रकरणातील आरोपीशी संगनमत करून गर्भपात केल्याप्रकरणी अतिरिक्त सत्र न्यायालय, अंबेजोगाई येथे दाखल झालेल्या सत्र प्रकरण क्रमांक ८२/२०१३ मध्ये न्यायालयाने दिलेल्या निर्णयातील प्रतिकुल शे-यानुसार डॉ.अशोक थोरात व डॉ.प्रतिभा थोरात यांचे विरुद्ध शिस्तभंग विषयक कारवाई सुरू करण्याचा प्रस्ताव दि, १९/०८/२०१५ च्या पत्रानुसार संचनालयाकडुन मागविण्यात आला असून याबाबत दि, ०३/१२/२०१५ व दि . ११/०२/२०१६ व दि . २०/०४/२०१६ रोजी पत्र पाठवून पाठपुरावा करण्यात आला आसल्याचे व अहवाल प्राप्त झाल्यानंतर मा.न्यायालयाचे आदेश विचारात घेऊन कारवाई करण्यात येईल असे रा.शं.जाधव, सहसचिव, महाराष्ट्र शासन यांनी दि.१७ मे २०१६ रोजी डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर, सामाजिक कार्यकर्ते यांना लेखी कळवले होते, परंतु ५ वर्ष होऊन गेले तरी चौकशी पूर्ण करण्यात येऊन कारवाई करण्यात आली नसल्याने संबंधित दोषींवर कारवाई करण्यात यावी.
डॉ. प्रतिभा थोरात यांनी ६ वर्ष काम न करता पगार हडपला, विभागीय चौकशी ५ वर्षे सुरूच:- डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर
----------------------------------------------- डॉ.प्रतिभा अशोक थोरात, वैद्यकीय अधिकारी यांनी ६ वर्षापासून कोणतेही काम करीत नसताना पगार घेत असल्याबाबत त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र नागरी सेवा ( शिस्त व अनुपालन) नियम १९७९ च्या नियम ८ नुसार दिनांक २७ /०१/२०१६ रोजी दोषारोपपत्र बजावण्यात आले आहे, त्यांचे निवेदन प्राप्त झाल्यानंतर नियमानुसार पुढील कारवाई करण्यात येईल असे कळवले होते.
तात्काळ विभागीय चौकशी पूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्री ,आरोग्यमंत्री , आयुक्तांना लेखी तक्रार :- डॉ. गणेश ढवळे लिंबागणेशकर
----------------------------------------------
वारंवार लेखी तक्रार करुनही गेली ५ वर्षे विभागीय चौकशी प्रलंबित ठेवून शासकीय सेवेत कसूर करणा-या संबंधितांवर योग्य ती प्रशासकीय कारवाई करण्यात यावी अशी मागणी जिल्हाधिकारी बीड, उपसंचालक आरोग्य सेवा परिमंडळ लातूर यांच्या मार्फत मुख्यमंत्री आरोग्यमंत्री आयुक्त आरोग्य सेवा संचनालय मुंबई यांना लेखी तक्रार केली आहे.