उरण दि 21(विट्ठल ममताबादे)
मंगळवार दि.19/10/2020 रोजी चिंद्रण, तालुका - पनवेल येथे शेतकऱ्यांची सभा पार पडली. सक्तीने होत असलेल्या एमआयडीसी प्रकल्पाच्या भूसंपानास यावेळी ग्रामस्थांनी प्रचंड विरोध केला.भूसंपादनाचा कोणताही मोबदला शेतकऱ्यांना न कळवता ,शेतकऱ्यांना विश्वासात न घेता प्रांताधिकारी यांनी चालवलेला भूसंपादन हा अन्यायकारक आहे.असे शेतकरी वर्गांचे मत आहे.जोपर्यंत ग्रामस्थांच्या मागण्या पूर्ण होत नाहीत तो पर्यंत या प्रकल्पसास येथील ग्रामस्थांचा कायम विरोध राहिल असे मत मार्गदर्शन करताना एडवोकेट सुरेश ठाकुर यांनी व्यक्त केले.
नवी मुंबई ९५ गाव संघर्ष समिती चे अध्यक्ष ऍड सुरेश ठाकूर यांनी चिंद्रान ग्रामस्थांना यावेळी संबंधित विषयावर मोलाचे मार्गदर्शन केले. ज्येष्ठ वकील ऍड मदन गोवारी यांनी शेतकऱ्यांच्या मागण्यांना जाहिर पाठिंबा दिला.एमआयडीसी प्रकल्प रद्द न केल्यास शासन विरोध प्रचंड जन आंदोलन करू असा निर्धार ग्रामस्थांनी यावेळी केला.यावेळी कामगार, शेतकरी, ग्रामस्थ वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.