मा.आमदार मनोहरशेठ भोईर यांच्या प्रयत्नांना यश
उरण तालुक्यातील बोकडवीरा येथील सिडको ट्रेनिंग सेंटर मध्ये डेडिकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटर होणार सुरु.
उरण दि 3(विठ्ठल ममताबादे )
महाराष्ट्र राज्यावर आलेल्या जीवघेण्या कोरोना महामारीचा संकट त्याचा प्रादुर्भाव उरण मध्ये देखील होत असून रुग्णांना उपचारासाठी नवी मुंबई व मुंबई येथे जावे लागत आहे. अनेक वेळा नवी मुंबई व मुंबई येथे बेड उपलब्ध होत नाही त्यामुळे उपचाराअभावी रुग्णांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.
त्याच अनुषंगाने ०२ नोव्हेंबर २०२० रोजी शिवसेना जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांनी मा.जिल्हाधिकारी रायगड यांच्यासोबत बैठक घेऊन सदर विषयावर चर्चा केली असून, लवकरच उरण मध्ये सिडकोच्या माध्यमातून डेडीकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटर सुरु होणार असल्यामुळे उरण मधील नागरिकांना आता नवी मुंबई व मुंबई येथे उपचारासाठी जावे लागणार नाही. उरण मध्येच सिडको ट्रेनिंग सेंटर, बोकडविरा येथे आता रूग्णांवर उपचार होणार आहेत.त्यामुळे कोरोना मुळे त्रस्त व्यक्तींना यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे.
या बैठकीवेळी सोबत सिव्हील सर्जन रायगड, डी.एच.ओ. रायगड, तहसिलदार उरण, सिडकोचे डॉ.बाविसकर, शिवसेना तालुकाप्रमुख रघुनाथ पाटील, कामगार नेते महादेव घरत, डॉ.मनोज भद्रे, डॉ.मोरे, सामाजिक कार्यकर्ते संतोष पवार, उपतालुका संघटक सुधीर पाटील, उपस्थित होते.