उरण शहरातील प्रतीक अपार्टमेंट मध्ये लागली आग. सुदैवाने जीवितहानी टळली.आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश.
उरण मधील मोठं मोठया इमारती, सोसायटी, अपार्टमेंट मधील नागरिकांनी सतर्कता बाळगण्याची गरज.
उरण दि 3(विठ्ठल ममताबादे )उरण शहरातील विमला तलावाला लागून असलेल्या नागाव रोडवरील प्रतीक अपार्टमेंटच्या इमारतीला ग्राउंड फ्लोअर वर शॉर्टसर्किट मुळे आज दि 3 रोजी सकाळी 6:15 वाजन्याच्या सुमारास आग लागली सुदैवाने या आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले असून सुदैवाने जीवितहानी टळली आहे.
प्रतीक अपार्टमेंट नागाव रोड, विमला तलाव (गार्डन )शेजारी येथे अपार्टमेंट मध्ये सकाळी 6:15 वाजण्याच्या सुमारास विजेच्या शॉर्ट सर्किट मुळे आग लागली आग जास्त भडकत होती. इमारत मधील नागरिक गाढ झोपेत होते तर काही नागरिक आपल्या कामावर जाण्याच्या गडबडीत होते. ग्राउंड फ्लोअर येथे सर्व नागरिकांचे विजेचे मीटर आहेत, मेन कनेक्शन आहेत तेथून जवळचवीजेच्या वायरला ही आग लागली. ही वायर संपूर्ण इमारत मध्ये सर्वत्र पसरली आहे . आग लागल्याचे समजताच बाजूला असलेल्या गार्डन मध्ये व्यायामासाठी, मॉर्निंग वॉक साठी आलेल्या नागरिकांनी एकच गर्दी केली मात्र एकानेही पुढे येऊन ती आग बुजवण्याचे प्रयत्न करत नव्हते. इमारत मधील नागरिक सुद्धा वरती अडकले होते त्यामुळे आग जास्त भडकण्याची लक्षणे दिसू लागली मात्र काही जागरूक नागरिकांनी प्रसंगावधान राखत या आगीवर नियंत्रण मिळविले.
उरण मधील महाराष्ट्र राज्यविद्युत वितरण कपंनी(MSEB)चे कर्मचारी सम्राट बहादुरे हे गार्डन मध्ये मॉर्निंग वॉकसाठी आले असताना ही घटना त्यांच्या लक्षात आली. जवळच असलेल्या डीपी जवळ जाऊन मेन बटन बंद केला. त्यांनी सदर बिल्डिंगचा विजेचा पुरवठा बंद केला. अचानक लागलेल्या आगीवर स्वतः आत जाऊन भडकलेल्या आगीवर रेती टाकली त्यांचे प्रयत्न बघून इतरांनीही प्रसंगावधान राखत रेती टाकली. कुणाल घाग, सामाजिक कार्यकर्ते अजित भिंडे, उरण नगर परिषदेचे कर्मचारी धनेश कासारे, पत्रकार विठ्ठल ममताबादे व इतर नागरिकांनी आग बुजविण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले. व आगीवर नियंत्रण मिळविले. सुदैवाने यात कोणतेही जीवितहानी झाली नाही. उरण मध्ये अश्या आग लागण्याच्या घटना वाढत असून नागरिकांनी याबाबतीत सतर्कता बाळगावी. असे आवाहन MSEB चे कर्मचारी सम्राट बहादुरे, पत्रकार विठ्ठल ममताबादे यांनी नागरिकांना केले आहे.