खोपटे बांधपाडा येथील स्म्शान भूमीच्या कामाचे भूमीपूजन 




खोपटे बांधपाडा येथील स्म्शान भूमीच्या कामाचे भूमीपूजन 

 

उरण दि 4(विठ्ठल ममताबादे)

 ग्रूप ग्रामपंचायत बांधपाडा, खोपटे हद्दीत पंचायत उपसभापती शुभांगी सुरेश पाटील यांच्या प्रयत्नातून जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) जण सुविधेसाठी विशेष अनुदानाने सन 2019-2020 अंतर्गत निधीमधून स्मशानभूमी बांधकाम करणे हे काम मंजूर करण्यात आले होते व त्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले. 

सदर स्मशान भूमीचा शेड हा काही महिन्यापूर्वी आलेल्या निसर्ग चक्रीवादलात जमीनदोस्त झाले होते व त्यामुळे जनतेची होणारी गैरसोय दूर करण्यासाठी सदर कामाचे  भूमिपूजन करण्यात आले.

सदर कार्यक्रमाप्रसंगी उरण पंचायत समितीच्या उपसभापती शुभांगी सुरेश पाटील, बांधपाडा ग्रामपंचायतचे सरपंच विशाखा प्रशांत ठाकूर, खोपटा गाव अध्यक्ष विश्वनाथ भास्कर पाटील, प्रदीप गणपत ठाकूर उद्योगपती,देवेंद्र पाटील उद्योगपती, अच्युत ठाकूर(ग्राम.सदस्य), देवानंद पाटील(ग्राम.सदस्य), संदेश म्हात्रे(ग्राम.सदस्य),मीनाक्षी म्हात्रे(ग्राम.सदस्या), कृष्णा ठाकूर(अध्यक्ष बांध पाडा), गिरिधर घरत (अध्यक्ष देऊल पाडा), राजेंद्र म्हात्रे(पाणी कमिटी सभापती), हेमंत ठाकूर, विश्वजित घरत, विश्वास पाटील, सुगंधा कोळी, कलावती घरत, परेश ठाकूर, परेश पाटील, सूरज ठाकूर, योगेश म्हात्रे, रुपेश ठाकूर, प्रीतम ठाकूर,विष्णु पाटील, पंकज ठाकूर, समीर ठाकूर, प्रशांत ठाकूर  व ग्रामस्थ उपस्थित होते.