नगरसेवक कृष्णा पाटील आणि नगरसेविका सौ. नंदा कृष्णा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली 350 जणांची मोफत अँटीजन तपासणी

ठाणे, दि. 18 - ठाणे महानगरपालिका, ठाणे कोविड झिरो मिशन अंतर्गत उथळसर प्रभाग समिती आणि दक्षता समिती यांच्या माध्यमातून नगरसेवक कृष्णा पाटील आणि नगरसेविका सौ. नंदा कृष्णा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली रविवार,18 एप्रिल रोजी मोफत कोवीड अँटीजन टेस्ट शिबीर प्रभागात तिन ठिकाणी आयोजित करण्यात आले. यावेळी 350 जणांची अँटीजन तपासणी करण्यात आली त्यात काल्हेर येथील 2 आणि मनोरमानगर येथील एका रिक्षाचालक अशा तिन रिक्षा चालकांची अँटीजन टेस्ट पॉझिटिव्ह आल्याने त्यांना योग्य मार्गदर्शन करुन पुढील उपचार घेण्यास सूचविले.
जरी-मरी माता मंदिर परिसर, नगरसेवक कार्यालय शेजारी, गोकुळनगर,  जागमाता मंदिर परिसर, कोलबाड आणि वृंदावन बस स्थानक येथे 18 एप्रिल रोजी सकाळी 10 ते दुपारी 4 वाजेपर्यंत 350 जणांची तपासणी करण्यात आली. यात रिक्षाचालक, दुकानदार, कंत्राटी कामगार यांचा समावेश होता.  
कोव्हिड नियमांचे पालन यावेळी करण्यात आले. भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी, चिटणीस सचिन पाटील, मंडल अध्यक्ष विजय रेडेकर, महिला मोर्चा चिटणीस रुक्साना शेख, कांचन पाटील, सपना अच्छा, सुरेश पवार, विनायक गालफाडे, विशाल बिरजे, विकास बेलोसे, अशोक जैसवाल, शंकर जाधव, मायाप्पा पाटील, अक्षय पाटील, गजानंद विश्वकर्मा,  कल्याणी सुर्वे, हर्षदा रेवाळे, सुनंदा जाधव, विकास अच्छा, मोरेश्वर बनसोडे, हितेश शिर्के, गणेश मोरे, ंसंदेश पवार, शशिकांत परब, राजेश झगडे, हेमंत कडव आदी कार्यकर्ते यावळी उपस्थित होते.
उथळसर प्रभाग समिती सहाय्यक आयुक्त  शंकर पाटोळे, कार्यालयीन अधिक्षक सौ. सुनीता सातपुते, ठाणे महापालिकेचे राजू अंधारे, मंगेश जाधव, अँटीजेन टेस्ट टीमचे अमित पोवार, प्रमोद गुडूळकर, स्वप्निल, संदेश पाटील, सुनिल गायकवाड, स्वप्निल शेटे, डॉ.अक्षय झोडगे, डॉ. जयेश परमार, डॉ. अश्विनी देशपांडे, डॉ.हर्षला पाटील आदींचे शिबिरासाठी सहकार्य लाभले.