रावते विद्यालय बाळदी चा उत्कृष्ट निकाल. २८ पैकी २८ विद्यार्थी प्राविण्यासह उत्तीर्ण.

 उमरखेड तालुका/ प्रतिनिधी:- अशोक गायकवाड 

ज्ञानप्रकाश शिक्षण प्रसारक मंडळ उमरखेड द्वारा संचालित श्रीमती मंजुळाबाई मारोतराव रावते माध्यमिक विद्यालय बाळदी या विद्यालयाने यावर्षी देखील आपल्या उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम राखली आहे.

    माध्यमिक शालांत इयत्ता दहावीच्या बोर्ड परीक्षेला या शाळेतील एकूण ३० विद्यार्थी प्रविष्ट झाले होते यापैकी दोन विद्यार्थी परीक्षेला गैरहजर राहिले असून २८ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती २८ पैकी २८ विद्यार्थी ही प्राविण्यासह प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत परंतु दोन विद्यार्थी परीक्षेला गैरहजर राहिले असताना देखील शाळेचा ९३.३३ टक्के असा उत्कृष्ट निकाल लागला आहे.



   यामध्ये वेदिका जाधव ८१.०० टक्के, पूजा काजळे ७७.००, मंगेश सुरोशे ७४.००, किसना राठोड ७३.००, गोकुळ चव्हाण ७२.००, आकाश कदम ७१.४०, काजल भोसले ७१.२०, ज्ञानेश्वर जाधव ७१.००, शिवम आडे ७०.००, शुभम सुरोशे ७०.००, ममता सावते ७०.००, लक्ष्मण ढाले ७०.०० टक्के, शारदा पोटे, नारायण राऊत, बुद्धभूषण दवणे, प्रभू पिनलवाड, गणेश राठोड, नागेश ठाकरे, सोहेल शेख मोहम्मद रफीक, मोहिनी चव्हाण, जगदीश पवार,  सोमनाथ ताकतोडे, चंदन राठोड, शेख काशीफ शेख असगर, प्रथम कुबडे, नील कोडगिरवार, जिवन जाधव, सत्यम बेटकर, प्राविण्‍यासह प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत ग्रामीण भागातील या विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.                   

     विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माजी आमदार प्रकाश पाटील देवसरकर, संस्थेच्या अध्यक्षा प्रिया युवराज पाटील देवसरकर, शाळेचे मुख्याध्यापक नागेश महाजन, शिक्षक गणेश शिंदे, गजानन साखरे, संदीप जाधव, बाळू वानखेडे व आपल्या आई-वडिलांना दिले आहे.